नालासोपारा :-
नालासोपारातील ओसवाल नगरी येथिल दिव्यांग सुनिल पांडे यांचा अपघात झाल्याने एक पाय निकामी झाल्याने त्यांना चालण्यास अडचण येत असल्याने त्यांना चालण्यासाठी वॉकर ची गरज नितांत होती. परिस्थितीत हालाखिची असल्याने घरात कमावणारे एक मुलगा असल्याने घराचा उदरनिर्वाह करतो. वॉकर मिळण्याबाबत त्यांनी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना सांगताच स्वखर्चातुन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी त्यांना मोफत वॉकर उपलब्ध करून देण्यात आली. तसेच त्यांन दिव्यांग प्रमाणपत्र व पेन्शन मिळवुन देण्यात येणार आहे. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मोफत रूग्णवाहिका हि उपलब्ध करून देण्यात आल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले. याकठिण परिस्थितीत केलेली मदतीमुळे त्यांचे मन भरून आले यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, युवा शहरप्रमुख समीर गोलांबडे, सामाजिक कार्यकर्ते मीरा दुबे जी उपस्थित होते.
Users Today : 18