रवींद्र शेंडे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व विदर्भ समन्वय समितीत गौरवपूर्ण नियुक्ती

KHOZ MASTER
2 Min Read

रवींद्र शेंडे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व विदर्भ समन्वय समितीत गौरवपूर्ण नियुक्ती

वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर महानगर अध्यक्ष मा. रवींद्र (रवी) शेंडे यांची पक्षाच्या पूर्व विदर्भ समन्वय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढणाऱ्या आणि आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावान, सक्षम आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शेंदे यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रवींद्र शेंदे हे मागील सात वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय असून, त्यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्रींच्या विरोधात निवडणूक लढवून पक्षाच्या वैचारिक ताकदीचे ठोस दर्शन घडवले. ते आंबेडकरी विचारसरणीचे ज्वलंत पुरस्कर्ते असून, खैरलांजी हत्याकांडाविरोधात उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक आंदोलनात त्यांची आक्रमक आणि निर्णायक भूमिका होती.

तसेच, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी अनेक वर्षे अखंड सहभाग घेतला असून, धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांच्यासाठी ते सतत संघर्षशील राहिले आहेत.

त्यांची ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्याची व निष्ठेची पावती असून, वंचित बहुजन आघाडीच्या विदर्भातील संघटनात्मक बांधणीला यातून निश्चितच नवसंजीवनी मिळेल. या नियुक्तीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला नव्या उर्जेने चालना मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

या विशेष प्रसंगी जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विवेक हाडके, प्रफुल माणके, सिध्दांत पाटील, धम्मदीप लोखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी रवींद्र शेंदे यांचे हार्दिक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

0 9 7 3 8 5
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *