मनसे अभियंता व कंत्राटदार संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी तुषार गिऱ्हे यांची निवड
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश जोशी आणि तुषार गिऱ्हे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या मनसे अभियंता व कंत्राटदार संघटनेच्या नागपूर व मुंबई विभागातील प्रमुख पदभरती आज पार पडली. या पार्श्वभूमीवर तुषार गिऱ्हे यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी, तर महेश जोशी यांची पूर्व विदर्भ विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी संघटनेचे प्रमुख विश्वस्त श्री. योगेश परुळेकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाला विश्वस्त विजय जाधव, अध्यक्ष गौरव वालावलकर, कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण, सरचिटणीस अमित शिंदे, चिटणीस सौ. नेहा भगत आणि कार्यकारिणी सदस्य विवेक उमासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघटनेच्या विस्ताराचा नवा टप्पा गाठताना ही दोन्ही नियुक्ती निर्णायक ठरणार आहेत. नागपूर जिल्ह्यासारख्या महत्त्वाच्या विभागाची धुरा तुषार गिऱ्हे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने संघटनेच्या कार्याला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गिऱ्हे हे गत अनेक वर्षांपासून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रीय असून, त्यांचा जमिनीवरचा अनुभव संघटनेच्या बळकटीस उपयुक्त ठरेल.
या नव्या जबाबदाऱ्यांमुळे संघटनेच्या कार्यपद्धतीत नवे नेतृत्व, नवा जोम आणि नव्या योजना राबवण्यात येतील, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. कार्यक्रमानंतर नविन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व सत्कार करत जोरदार स्वागत करण्यात आले.
Users Today : 37