मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील कामगारांच्या हक्कांचे संरक्षण हे माझे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे विधान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले. बदलत्या औद्योगिक युगात कामगारांचे हित जपण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत असून बोगस कामगार नोंदणी, ठेकेदारांकडून होणारे शोषण तसेच असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी विविध पातळ्यांवर कारवाई सुरू आहे.
कामगारांची बोगस नोंद रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक कामगाराची बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बोगस ठेकेदारांचा पर्दाफाश होऊन शोषित कामगारांना न्याय मिळेल, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.
बोगस ठेकेदारांविरोधात आतापर्यंत १५ ते २० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, विशेष तपासणी पथकांचीही स्थापना करण्यात आली असून, या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
स्विगी, झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी सरकार लवकरच स्वतंत्र कायदा आणणार असून, त्याद्वारे त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.
सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांवरील अन्यायप्रकरणी कामगार मंत्री फुंडकर यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली असून, संबंधित कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यांनाही सुरक्षिततेची आणि हक्कांची हमी मिळावी यासाठी शासन पावले उचलत आहे.
बोगस माथाडी कामगार प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर एसआयटीमार्फत चौकशी करण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाला आहे. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री फुंडकर यांनी दिले.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित चार नवीन कामगार कायद्यांपैकी दोन कायदे राज्यात लागू करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. उरलेले दोन कायदे कामगार प्रतिनिधींशी चर्चा करूनच लागू करण्यात येणार आहेत.
“कामगार हे समाजाचा कणा आहेत”
कामगारांचे हित जोपासणे, त्यांच्या समस्या समजून घेणे व त्यावर निर्णय घेणे हेच माझे खरे कर्तव्य आहे. कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही आणि सरकार कामगारांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असे मंत्री फुंडकर यांनी ठामपणे सांगितले
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण माझे सर्वोच्च कर्तव्य – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे विधान परिषदेत ठाम प्रतिपादन
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment