अनुसूचित जाती-वर्गीय महिला अधिकाऱ्यावरील अन्यायाविरोधात “कास्ट्राईब महासंघ” आक्रमक – श्रीमती संघमित्रा ढोके यांना न्याय मिळावा, अन्यथा आमरण उपोषण
11 जुलै 2025📍 नागपूर
CASTRIBE FEDERATION (महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ) व अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व बौद्ध कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज एका महत्त्वपूर्ण पत्रपरिषदेत शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. विषय होता – नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती संघमित्रा ढोके यांच्यावर करण्यात आलेला अन्याय.
🔴 अन्यायाची ठळक बाबी:
श्रीमती ढोके या दिनांक 7 जुलै 2010 रोजी अनुसूचित जाती (महिला) दिव्यांग (अल्पदृष्टी) प्रवर्गातून नगर विकास विभागात मुख्याधिकारी गट व या पदावर नियुक्त झाल्या.
त्यांचा 31 जुलै 2025 हा सेवानिवृत्तीचा दिवस असून, सेवा संपण्यास केवळ 20 दिवस उरले आहेत.
तथापि, 11 मार्च 2022 रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीत, त्यांच्यावरील कोणतेही ACB प्रकरण नसताना त्यांचे नाव पदोन्नतीसाठी विचारात घेतले गेले नाही.
याबाबत त्यांनी माहिती घेतली असता, “अनवधानाने (कॉपी-पेस्ट)” नाव वगळल्याचे उत्तर मिळाले – ही बाब अत्यंत लज्जास्पद असल्याची महासंघाची भूमिका आहे.
याशिवाय, त्यांच्याच कार्यालयात ज्युनियर अधिकाऱ्यांची त्यांच्या वरच्या पदावर नियुक्ती करण्यात आली – ही बाब थेट वंचित आरक्षणातील महिलांवरील अन्याय आहे.
⚠️ आंदोलनाची चेतावणी:
महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी जाहीर केले की:
> “जर श्रीमती संघमित्रा ढोके यांना त्यांच्या दिव्यांग प्रवर्गातील आरक्षणाचा न्याय, 2016 नंतरची पदोन्नती, आणि सेवाजेष्ठतेसह अन्य लाभ तत्काळ बहाल करण्यात आले नाहीत, तर त्या 14 जुलै 2025 पासून आमरण उपोषणाला बसतील. शासनाने हा गंभीर इशारा वेळेत लक्षात न घेतल्यास महासंघाकडून राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”
✊ पत्रकार परिषदेस उपस्थित:
या पत्रपरिषदेस अरुण गाडे, प्रा. डॉ. वंदना इंगळे, शामराव हाडके, प्रा. मधुकर उईके, प्रा. राहुल मून, अरविंद पाटील, अशोक पाटील, रवि पोथारे, राजेश ढंगरे, संजय अंभोरे, रंजित रामटेके, राजेंद्र गणवीर, विनोद मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 मागणी:
> “श्रीमती संघमित्रा ढोके यांना तातडीने पदोन्नतीसह इतर सेवा लाभ मिळावेत, त्यांच्या प्रतिमेवर झालेल्या आघाताची दखल घेतली जावी व दिव्यांग महिला अधिकार्यांवरील अन्याय दूर करण्यात यावा.”
📰 अगर आपके पास कोई स्थानीय खबर, फोटो या वीडियो है, तो कृपया खोजमास्तर को भेजें:📲 WhatsApp नंबर: 8975950362
Users Today : 30