‘महेश काळे अभंगवारी’ पहिल्यांदाच नागपुरात — रसिकांसाठी भक्तिरसाची पर्वणी!

Khozmaster
1 Min Read
Oplus_131072

‘महेश काळे अभंगवारी’ पहिल्यांदाच नागपुरात — रसिकांसाठी भक्तिरसाची पर्वणी!

नागपूर | १९ जुलै २०२५ — नागपूरकर संगीतप्रेमींना यंदा खास संगीतमैफिलीचा आनंद अनुभवता येणार आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले शास्त्रीय गायक महेश काळे आपला अत्यंत लोकप्रिय ‘अभंगवारी’ कार्यक्रम प्रथमच नागपुरात सादर करणार आहेत.

एकदंत थिएटर्स आणि ताल क्रिएशन यांच्या वतीने हा अद्वितीय कार्यक्रम १९ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता नागपूरमधील प्रतिष्ठित सुरेश भट सभागृहात रंगणार आहे.

अभंगवारी’ या संगीतमय प्रवासात महेश काळे विठ्ठलभक्तीचे दर्शन प्रचलित अभंग, भावस्पर्शी रचना व काही दुर्मिळ गीतांच्या माध्यमातून घडवतात. भक्तिरसात न्हालेल्या या मैफिलीने त्यांनी जगभरातील संगीत रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.

या भक्तिमय कार्यक्रमाचे निवेदन लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर करणार असून, कार्यक्रमातच प्रसिद्ध चित्रकार उमेश पांचाळ यांची विशेष कलाकृती सादर होणार आहे. ते रंगभूमीवर विठ्ठलाची विविध रूपे कॅनव्हासवर रंगवून जिवंत करतील, हे देखील रसिकांसाठी अनोखे आकर्षण ठरेल.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि मध्य नागपूरचे आमदार मा. प्रवीण दटके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तिकिट वितरण:

सुरेश भट सभागृह — दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७

फोन बुकिंगचीही सुविधा उपलब्ध आहे.

📞 बुकिंगसाठी संपर्क:

९४०४८२८६९३ | ९९६००३२०३८

✨ भक्तिरस, शास्त्रीय संगित आणि चित्रकलेचा अनोखा संगम — ‘महेश काळे अभंगवारी’ रसिकांना अविस्मरणीय अनुभव देणार आहे, हे नक्की!

0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *