बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील कांबळे येथील राहुल आनंद भगत या जवानास काश्मीरच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना काल वीरमरण आले. ते २८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांना देशसेवा करत असताना देशाच्या सीमेवर वीरगतती प्राप्त होऊन वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या इसाने कांबळे तालुका महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यावर दुःखद शोककळा पसरली आहे.
शहीद राहुल आनंद भगत (शिपाई)
जन्म- दि.10/03/1996
मिलिट्री भरती- 20/06/2015 (1 EME -center-sikandrabad)
सध्या कार्यरत- जम्मू,जिल्हा- बारामुल्ला सेक्टर-13 आर.आर (राष्ट्रीय रायफल) यांच्या वीर मरणामुळे त्यांच्या कुटुंबासह कांबळे महाड आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळून जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
शहीद राहुल आनंद भगत यांच्या पश्चात त्यांची पत्नी मिना राहुल भगत- पत्नी वय 25 वर्ष, आयांश राहुल भगत-मुलगा वय वर्ष 03, आनंद सिताराम भगत-वडील वय वर्ष 65, सुनंदा आनंद भगत-आई वय वर्ष 56, देवा आनंद भगत-भाऊ वय वर्ष 24 असा परिवार आहे.
शहिद राहुल आनंद भगत यांचे मूळ गाव मु.पो.पिंपळदरी, ता.औढा नागनाथ, जि.हिंगोली असून त्यांचे कुटुंब सध्या इसाने कांबळे तालुका महाड जिल्हा रायगड येथे सन 1980 पासून राहतात. शहिद राहुल भगत यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावी आणून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्यात येईल.