बळवंतराव मोरघडे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या राज्य कोषाध्यक्षपदी निवड

Khozmaster
2 Min Read

बळवंतराव मोरघडे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या राज्य कोषाध्यक्षपदी निवड

📍 नागपूर | दिनांक : ६ ऑगस्ट २०२५

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक ५ ऑगस्ट रोजी नागपूर येथील जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाइन्स येथे संपन्न झाली. या बैठकीत नागपूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बळवंतराव मोरघडे यांची राज्य कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार रामदासजी तडस होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य महासचिव डॉ. भूषण कर्डिले, विद्यमान कोषाध्यक्ष गजानन शेलार, उद्योग आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गवळी, युवा आघाडीचे अध्यक्ष अतुल वांदिले, प्रा. राजेंद्र झाडे, किशोर दंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. बळवंतराव मोरघडे हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सक्रिय आहेत. त्यांनी प्रांतिक तैलिक महासभेत सहसचिव व विदर्भ प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली असून, समाज संघटनाच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

कुही तालुक्यातील सिल्ली या छोट्याशा गावात जन्मलेले मोरघडे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले असून, नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीत कार्यालय सचिव, जीवनविकास एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि सी. मो. झाडे फाउंडेशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय मा. खासदार रामदास तडस, गजानन शेलार व डॉ. भूषण कर्डिले यांना दिले.

त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करणाऱ्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे:

अतुल वांदिले, प्रा. राजेंद्र झाडे, नंदकिशोर दंडारे, जगदीश वैद्य, नयना झाडे, प्रवीण बावनकुळे, किशोर भिवगडे, शुभम लोहकरे, पुष्कर डांगरे, रमेश उमाटे, देवेंद्र काळबांडे, मंगला मस्के, विलास गभने, डॉ. देवमन कामडी, नीलिमा वाघमारे, निखिल भुते, हरिश्चंद्र दहाघणे, केशवानंद सूरकर, चंद्रभान मेहर आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *