प्रखर राष्ट्रभक्तीमुळे भारत मजबूत – क्रांतीदिनानिमित्त श्रीगुरुदेव सेवामंडळाचा कार्यक्रम

Khozmaster
1 Min Read

प्रखर राष्ट्रभक्तीमुळे भारत मजबूत – क्रांतीदिनानिमित्त श्रीगुरुदेव सेवामंडळाचा कार्यक्रम

नागपूर : श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर यांच्या वतीने ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. सुरेंद्र बुराडे होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “९ ऑगस्टचा ‘करो या मरो’ हा घोष सर्वसामान्य जनतेत प्रखर राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा ठरला आणि स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला.”

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रा. टेकाडे यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, देवभक्तीतून देशभक्तीचा मार्ग राष्ट्रसंतांनी दाखविला आहे. अध्यक्षपद भूषविणारे अशोक यावले यांनी स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत म्हटले की, “स्वातंत्र्यसैनिकांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.”

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतीगीताने झाली. संचालन राजेश कुंभलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप सुरकार यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सचिव विठ्ठल पुनसे, प्रचारप्रमुख सियाराम चावके, मुरलीधर नरड, संगिता जावळे, राजु पवार, माथने, तळवेकर, अशोक काकडे, ललित खवसे तसेच बहुसंख्य गुरुदेवप्रेमी उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *