अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद, हिंगणा : भव्य बाईक रॅलीने साजरा जागतिक आदिवासी दिन

Khozmaster
3 Min Read






जागतिक आदिवासी दिन – हिंगणा बाइक रॅली


अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद, हिंगणा

भव्य बाईक रॅलीने साजरा जागतिक आदिवासी दिन

📍 नागपूर | 9 ऑगस्ट क्रांतीदिन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद,
हिंगणा तालुका तर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली
नागपूर-वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथून सुरू होऊन गोंड राजे बक्त
बुलंद शहा चौक, नागपूर येथे उत्साहात संपन्न झाली.

रॅलीच्या प्रारंभी जामठा येथील सरपंच योगेश टेकाम, अध्यक्ष मिलिंद कोवे,
समाजसेवक शरद सराटे, बंडू चीवंडे, रंगाभाऊ परतेकी यांची प्रमुख
उपस्थिती होती.

या भव्य आयोजनासाठी परिषदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद मसराम,
विदर्भ अध्यक्ष संतोष आत्राम, तसेच गणेश बालवंशी, दर्शन कुलसंगे,
सौरभ मसराम, चंदू मरसकोल्हे, मंगेश मरसकोल्हे, शिवाजी मरसकोल्हे,
अनिल धुर्वे, विकास करपते, अरविंद कोवे, अंकेश कोवे, राहुल परतेकी,
सारंग कुळमथे, निखिल कुंभरे, भोला सयाम, सचिन वलके यांसह मोठ्या
संख्येने आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.

रॅलीदरम्यान – “आदिवासी एकता”, “संविधान आमचा अभिमान” आणि
“आमचे हक्क – आमचा संघर्ष” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

या रॅलीद्वारे सामाजिक ऐक्य, संस्कृतीचा वारसा आणि हक्कांसाठी जनजागृतीचा
संदेश देण्यात आला.


0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *