राज्यस्तरीय माळी समाज युवक-युवती परिचय मेळावा — 12 ऑक्टोबर 2025, नागपूर अखिल भारतीय माळी महासंघ व क्रांतीज्योती माळी विकास संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

Khozmaster
1 Min Read

राज्यस्तरीय माळी समाज युवक-युवती परिचय मेळावा १२ ऑक्टोबरला नागपुरात

नागपूर : अखिल भारतीय माळी महासंघ व क्रांतीज्योती माळी विकास संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजातील राज्यस्तरीय उपवर युवक-युवती पालक परिचय मेळावा रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा गिता मंदिर, सुभाष रोड, कॉटन मार्केट, नागपूर येथे सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार असून, मोठ्या संख्येने विवाहयोग्य युवक-युवतींचा परिचय करून दिला जाणार आहे. यावेळी ‘शुभमंगलम’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन देखील होणार आहे.

अलीकडेच विश्वभारती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, लोकमत भवन येथे झालेल्या नियोजन बैठकीला अध्यक्ष श्री. गोविंदराव वैराळे यांनी अध्यक्षता केली. या वेळी श्री. पद्माकर भेलकर (उटघाटक), श्री. मधुसुदन देशमुख (स्वागताध्यक्ष), कैलास जामगडे (संयोजक), शिवराम गुरनूले (सरचिटणीस) तसेच अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

नोंदणी प्रक्रिया:

  • ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ: www.kjmalivikas.com

  • प्रत्यक्ष नोंदणीसाठी पत्ता: विश्वभारती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, लोकमत भवन चौक, वर्धा रोड

  • तसेच इतर नोंदणी संपर्क प्रमुखांमार्फतही नोंदणी उपलब्ध.

आयोजन समिती व गोविंद वैराळे यांनी समाजबांधवांना आवाहन केले की, या मेळाव्याचा लाभ घेऊन विवाह जोडणीस प्रोत्साहन द्यावे.

प्रसिद्धी प्रमुख: देवराव प्रधान

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *