कामगार नेते नरेश अडचुले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार “समाजहितासाठी संघर्ष करणे हेच संघटनेचे ध्येय” — रमेश पाटणे

Khozmaster
3 Min Read






कामगार नेते नरेश अडचुले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार


कामगार नेते नरेश अडचुले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

“समाजहितासाठी संघर्ष करणे हेच संघटनेचे ध्येय” — रमेश पाटणे

नागपूर : “एकता, संघर्ष, त्याग व बलिदान हिच कुठल्याही संघटनेची आदर्श चतु:सुत्री आहे.
एकतेच्या बळावर संघटनेचे कार्य कामगारहित व उद्योगहित जपण्यासोबत समाजहितासाठी संघर्ष करणे हेच खरे कामगार संघटनेचे ध्येय आहे,”

असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे यांनी केले.

महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने सन्मानित आणि
३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर एलआयसीतून सेवानिवृत्त झालेले
नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे कामगार नेते नरेश अडचुले यांच्या सेवानिवृत्तीपर
सत्कार सोहळ्याचे आयोजन मोहन नगर स्थित सहकार जीवन सभागृहात संघटनेतर्फे करण्यात आले होते.

मान्यवरांचा गौरव

सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ नेते अनिल ढोकपांडे, रमेश पाटणे, वाय. आर. राव, शिवा निमजे, पी. व्ही. मिलिंदकुमार यांच्या शुभहस्ते
नरेश अडचुले व सौ. तनवी अडचुले यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

विकास अधिकारी राजेंद्र जैन, राजेश सतिजा, सुनिल डोंगरे, श्रीकांत पवनीकर, राजकुमार फुलबांधे यांनीही आपल्या
शुभेच्छापर भाषणातून नरेश अडचुले यांच्या कार्याचा गौरव केला.

संघटन सेवेला मानाचा मुजरा

लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समाजवाद या संवैधानिक मूल्यांना आदर्श मानून विमा कामगारांच्या
न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नरेश अडचुले यांच्या
प्रामाणिक कार्याचा, भावपूर्ण संघटन सेवेचा सर्व कामगार नेत्यांनी गौरव केला.

त्यांच्या संघटन कार्याची प्रशंसा करत सर्वांनी सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष व मनोगत

कार्यक्रमाचे अध्यक्षपद संघटनेचे अध्यक्ष शिवा निमजे यांनी भूषविले.

सत्काराला उत्तर देताना नरेश अडचुले यांनी
ज्येष्ठ कामगार नेते व सभासदांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल, मार्गदर्शनाबद्दल व भक्कम पाठिंब्याबद्दल
मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

उपस्थिती व संचालन

या निरोप समारंभाला विमा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन महासचिव वाय. आर. राव यांनी केले, तर
आभार प्रदर्शन हिना जिभकाटे यांनी मानले.



0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *