अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बुटीबोरीत प्रा. हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
बुटीबोरी (जि. नागपूर) | ११ ऑगस्ट २०२५ –
समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि प्रगत विचारांचा आवाज असलेले विचारवंत तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वैचारिक आधारस्तंभ प्रा. हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुटीबोरी येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. नरके यांच्या छायाचित्राला हार अर्पण करून करण्यात आली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महात्मा फुले विचारसरणीचा प्रसार, अभ्यास आणि लोकजागृतीसाठी वाहिले. तळमळीचे लेखक, सखोल अभ्यासक व प्रभावी वक्ते म्हणून त्यांनी हजारो लोकांच्या विचारविश्वाला दिशा दिली.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ. विद्या बहेकार यांनी भूषविले. तसेच हिंगणा तालुकाध्यक्ष दैवांती बाराई, हिंगणा कार्याध्यक्ष सौ. अर्चना भगत, हिंगणा तालुकाध्यक्ष कल्पना माकोडे, बुटीबोरी संघटक सौ. शुभांगी पाटील, सचिव वैशाली देवगिरीकर, सदस्य सौ. पिकी निषाद, सौ. प्राची नेवारे, मोनिका शरणागत, आशा साबरे यांच्यासह सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“प्रा. हरी नरके यांचे विचार हे सामाजिक न्यायाच्या लढाईतील दिशा आणि प्रेरणा आहेत,” असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
Users Today : 45