जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन १७ ऑगस्ट रोजी नागपूरात, राज्यभरातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी होणार सहभागी, महत्त्वाच्या मागण्या मांडल्या जाणार

Khozmaster
2 Min Read

जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन १७ ऑगस्ट रोजी नागपूरात
राज्यभरातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी होणार सहभागी, महत्त्वाच्या मागण्या मांडल्या जाणार

नागपूर — जिल्हा परिषदेतील बांधकाम, सिंचन व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी यांची शासनमान्य एकमेव सक्रिय संघटना — जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र — यांचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन यंदा १७ ऑगस्ट २०२५ रोजी उपराजधानी नागपूर येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथे करण्यात आले असून उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर श्री. विनायक महामुनी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष श्री. सुहास धारासुरकर राहणार आहेत.

या अधिवेशनात जिल्हा व राज्य पातळीवरील अभियंता संवर्गाच्या सेवा व आस्थापना विषयक समस्या, मागील कार्यकारिणीचे शासनस्तरावर केलेले प्रयत्न, तसेच नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. संघटनेचे एकूण ५,००० सदस्य असून संघटनेला औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांची मान्यता आहे.

🔹 जिल्हास्तरीय प्रमुख मागण्या

  • कार्यालयीन कामकाज सुसूत्रीकरणासाठी E-MB प्रणाली लागू करणे

  • पदवीधर कनिष्ठ अभियंत्यांना तीन वर्षांच्या गोपनीय अहवालावर आधारित सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदोन्नती

  • घरकुल कामे फक्त RHE मार्फतच कार्यान्वित करणे

  • कार्यमूल्यमापन अहवालाची प्रत उपलब्ध करून देणे

  • जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात नवीन उपविभाग व विद्युत उपविभाग निर्मिती

  • प्रवासभाडे भत्ता वेतनात समाविष्ट करणे

  • पदोन्नती प्रक्रिया ठराविक वेळेत पूर्ण करणे

🔹 राज्यस्तरीय प्रमुख मागण्या

  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील उपअभियंता पदांवर जिल्हा परिषद अभियंत्यांना तदर्थ पदोन्नती

  • बांधकाम कामासाठी ई-अंदाजपत्रक व ई-एमबी प्रणाली तात्काळ लागू करणे

  • पात्र कनिष्ठ अभियंत्यांना S-25 सुधारित वेतनश्रेणी लागू करणे

  • प्रत्येक तालुक्यात बांधकाम उपविभाग निर्मिती

  • प्रवासभत्ता दरमहा किमान ₹10,000 अदा करणे

  • “अभियंता भवन” मुंबईत बांधण्याकरिता भूखंड उपलब्ध करून देणे

  • अभियंत्यांना अतांत्रिक कामे न सोपविणे बाबत आदेश

पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष इंजी. राहुल राघोर्ते यांनी अधिवेशनाची तयारी व स्थानिक सदस्यांच्या अडचणींबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हासचिव इंजी. गणेश शहारे, कार्याध्यक्ष व राज्य सहसचिव इंजी. रवी मिरगे, उपाध्यक्ष इंजी. दिनेश मुनीश्वर, कोषाध्यक्ष महिला इंजी. स्नेहल पिपरे तसेच अन्य पदाधिकारी व अभियंते उपस्थित होते.

0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *