शहीद कैलास पवार स्मारकाचे काम प्रगती पथावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलनाचे फलीत

Khozmaster
2 Min Read

_प्रतिनीधी रवि मगर_चिखली:- येथील गजानन नगर मध्ये राहणारे आणि सियाचीन मध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारा लष्करी जवान कैलास भारत पवार एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण करून घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून घसरल्याने खाली कोसळला. व त्यातच त्याला वीर मरण आले. त्याचे पार्थिवावर बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी अनेकांनी त्याचे स्मारक चिखली शहरात व्हावे, ही इच्छा व्यक्त केली होती. त्यादृष्टीने सदर स्मारकाचे काम नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असून ते आज रोजी प्रगतीपथावर आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियर मधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य सेल्सियस खाली असतो. अशा भयानक थंडीमध्ये देखील लष्करी जवान डोळ्यात तेल घालून चिनी आणि पाकिस्तानी कारवायावर नजर ठेवून असतात. वेळप्रसंगी युद्धास देखील तयार असतात. अशा दुर्गम भागात व बर्फाच्छादित प्रदेशात चिखली येथील गजानन नगर (मूळचा अंबाशी गावचा ) रहिवासी कैलास भारत पवार हा गेल्या २ ऑगस्ट २०२० पासून ३ महार बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होता. त्याची शियाचीन मधील एक वर्षाची ड्युटी १ ऑगस्टला संपली होती. तो सहा महिन्याच्या सुट्टीवर घरी येणार होता. आपल्या सहकाऱ्यांसह तो डोंगरावरून बर्फाळ डोंगरावरून त्याचा पाय घसरून तो खाली कोसळला. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्याला तेथून उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या पार्थिवावर बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी  ११ वाजता चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात लष्कर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी तत्कालीन पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांचेसह मनोगत व्यक्त करणाऱ्या अनेकांनी शहीद कैलास पवार यांचे स्मारक चिखली शहरांमध्ये असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांतभैय्या डोंगरदिवे आणि सुनील सुरडकर यांनी आमरण उपोषण देखील केले होते. त्याचप्रमाणे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने माजी नगराध्यक्ष पती किशोरभाऊ कदम यांच्या संकल्पनेतील शहीद स्मारक उभारण्यास सुरुवात करून या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. चिखली शहरामध्ये स्मारक व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांनी सुद्धा प्रयत्न करून पुढाकार घेतला होता.

 

0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *