मुंबई :
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचा संगम असलेला हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून दोन दिवसांतच त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ‘उस्मान खिल्लारी’ ही भूमिका साकारली आहे. या पात्रातील त्याचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. याच निमित्ताने सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत महेश मांजरेकरांप्रती मनोगत व्यक्त केले आहे.
सिद्धार्थ जाधवची भावनिक पोस्ट
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणतो —
“महेश सर, तुमच्यासाठी काय लिहावं हेच कळत नाहीये. तुम्ही केवळ एक दिग्दर्शक नाही, तर माझ्या आयुष्यातील ‘देवमाणूस’ आहात. तुमच्यासोबत काम करताना एक अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. ‘दे धक्का’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘लालबाग परळ’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘कुटुंब’ आणि आता ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’पर्यंत पोहोचला. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी विविध भूमिका साकारू शकलो.”
तसेच तो पुढे म्हणतो,
“तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी ‘उस्मान खिल्लारी’सारखी आव्हानात्मक भूमिका साकारू शकलो. त्या भूमिकेला आणि सिनेमाला आज प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. सर, तुमचा प्रत्येक शब्द आणि निर्णय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. Love you sir!!! — तुमचाच, सिद्धार्थ जाधव.”
चित्रपटाची संकल्पना
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज अवतरतात आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढा देतात, अशी प्रभावी संकल्पना या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. महाराष्ट्राची प्रेरणा, शौर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या चित्रपटात पाहायला म
Users Today : 18