मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा फटका – केवळ ८० लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण

Khozmaster
1 Min Read

मुंबई प्रतिनिधी ;-
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, योजनेत बोगस लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने लाभ वितरणावर निर्बंध घालत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली.

मात्र, दोन महिने उलटूनही अनेक महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे तब्बल २.४० कोटींपैकी फक्त ८० लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत राज्यभरातील दोन कोटी ४० लाख महिलांना लाभ मिळत असून, १८ सप्टेंबरपासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक लाभार्थींना ओटीपी न मिळणे, आधार क्रमांक न जुळणे, मोबाइल संलग्नतेतील तांत्रिक समस्या अशा विविध कारणांमुळे प्रक्रिया अडकली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविणे, ग्रामपंचायत व महिला बचतगटांमार्फत माहिती देणे यावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, अनेक जिल्ह्यांत महिला केंद्रांवर ई-केवायसीसाठी मोठी गर्दी होत असून, महिलांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. शासनाने या प्रक्रियेला गती देण्यासाठी तांत्रिक सुधारणा व अतिरिक्त सेवा केंद्रे सुरू करण्याचा विचार सुरू केल्याचे समजते.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *