बुलढाणा प्रतिनिधी ;-
शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत आणि अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आज, ९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, सरकारवर जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या की, “राज्याचं दुर्दैव आहे, शेतकरीविरोधी लोक सत्तेत बसले आहेत.”
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असल्याचे त्या म्हणाल्या. महायुतीतील काही मंत्री आणि पदाधिकारी सातत्याने शेतकऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
जयश्रीताईंनी पुढे सांगितले—
“सुतगिरण्या, साखर कारखान्यासाठी कर्ज हवे असते तेव्हा शासन मदतीला तयार असते; मात्र शेतकरी दोन लाखांच्या कर्जमाफीची मागणी करताच त्याची हेटाळणी होते. हे शेतकऱ्यांचे अपमान करणारे सरकार आहे.”
दरम्यान, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
त्या म्हणाल्या—
“पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी कंपनीच्या सर्व संचालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. नैतिकतेच्या आधारावर अजित पवार यांनी राजीनामा द्यावा.”
या गंभीर आरोपांमुळे राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे आहेत
शेतकरीविरोधी सरकार; पार्थ पवार जमीन प्रकरणी सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करावा — जयश्रीताई शेळके
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment