मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी बैठकीचे आयोजन आज मुंबईत करण्यात आले. बैठक अत्यंत प्रभावी आणि यशस्वीरीत्या पार पडली.

Khozmaster
1 Min Read

मुंबई प्रतिनिधी ;-

या महत्त्वपूर्ण बैठकीस
– भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री *शिवप्रकाश*,
– भाजपा प्रदेशाध्यक्ष *आ. रवींद्र चव्हाण*,
– राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते,
– तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे *स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी* मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य आढावा व बैठकीतील मुद्दे
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी खालील महत्त्वाचे विषय सविस्तर चर्चिले गेले—
* निवडणूक नियोजन
* वॉर्डनिहाय रणनीती
* संघटनात्मक बळकटीकरण
* बूथ पातळीवरील सक्रियता वाढविणे
* सरकारच्या विकासकार्यांचा प्रभावी प्रसार
बैठकीत राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, तसेच जनतेपर्यंत विकासाचा अजेंडा प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
भाजपची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील तयारी अधिक वेगाने आणि काटेकोरपणे करण्यात येईल, असा विश्वास बैठकीतून व्यक्त झाला.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *