कुऱ्हा प्रतिनिधी ;-
कुऱ्हा पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धडक कारवाई करत तब्बल ५४ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ९ लाख ४० हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ आणि कंटेनरचा समावेश आहे.
आरोपी ताब्यात
उमेश भानू यादव (३७), रा. बैतुल, मध्य प्रदेश*
सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.
कारवाईची माहिती
कुऱ्हा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर अवैध तंबाखूची वाहतूक होत असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडवले. नंतर अन्न व औषध विभागाला माहिती देऊन तपासणी करण्यात आली.
अन्न व औषध विभागाच्या उपस्थितीत पंचनामा
निरीक्षक गजानन गोरे यांच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करण्यात आली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळले.
पोलिसांची संयुक्त कारवाई
ही कारवाई *ठाणेदार अनुप वाकडे* यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.उ.नि. विलास थुल
अनिल निंघोट
उमेश वाघमारे
दर्पण बनसोड
सागर निमकर
यांनी केली.
कुऱ्हा पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 18