विशेष प्रतिनिधी ;-
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ साठी भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे समर्पित नेतृत्व, संघटनेप्रती निष्ठा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा हीच भाजपच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना म्हटले की,
“आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपाला नवी ऊर्जा, नवा जोश आणि विजयाची नवी उंची लाभेल.
भाजपाचा भगवा जनतेच्या सेवेत अधिक जोमाने फडकत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
शुभेच्छा संदेशात पुढे नमूद करण्यात आले —
“नेतृत्व प्रेरणादायी, वाटचाल विजयाची!”
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment