पातुर प्रतिनिधी :-
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणे अंतर्गत नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेत पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अकोला न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले आहेत.
ही घटना ११ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली, तेव्हा संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला शाळेच्या आवारातच चांगलाच चोप दिला.
घटनेचा तपशील
नवेगाव शाळेतील शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यांनी गेल्या काही दिवसांत शाळेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.
या मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी पीडित मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
न्यायालयीन कारवाई
१२ नोव्हेंबर रोजी आरोपीला अकोला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षकाला कारागृहात रवानगीचे आदेश दिले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ग्रामस्थांचा इशारा
घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांनी प्रशासनाला आरोपी शिक्षकाची नवेगाव जिल्हा परिषद शाळेतून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे.
अन्यथा, “शाळेला कुलूप लावू,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची कारागृहात रवानगी पातुर तालुक्यातील नवेगाव प्रकरण; संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला दिला चोप
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment