भोकरदन प्रतिनिधी ;-
ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि वेगाने वाढत असलेले भोकरदन शहर आज वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. शहरात वाढती लोकसंख्या, बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
नवीन रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले तरी काही भाग अजूनही जुन्या अरुंद रस्त्यांवरच वाहतूक खोंबली आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, वाहनधारक कुठेही वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीचा वेग ठप्प, आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
रस्त्यांवर खोदकाम, अपूर्ण दुभाजक आणि धोक्याची ठिकाणे
गेल्या वर्षभरात विविध कंपन्यांनी केबल अंथरण्यासाठी रस्त्यांवर खोदलेले चर अजूनही नीट बुजवले गेलेले नाहीत. परिणामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा अपघातांचा केंद्रबिंदू बनला आहे. या चौकात दुभाजक, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक नसल्याने रात्री अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाहनांचे टायर फाटणे, पाटे तुटणे, तसेच छोट्या वाहनांना मोठ्या वाहनांची धडक बसणे अशा घटना वारंवार घडत असून, रस्त्यांवरील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव जाणवतो.
बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणाचा अडथळा
छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिवाणी न्यायालय, बाजार समिती प्रवेशद्वार आणि महात्मा फुले चौक ही ठिकाणे वाहतूक कोंडीची प्रमुख केंद्रे बनली आहेत.
रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या फळांच्या गाड्या, दुकानदारांचे फलक, राजकीय बॅनर आणि रस्त्यावरचे अतिक्रमण यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे.
प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर वाहन उभे करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करणे अपेक्षित असताना, याचे पालन न झाल्याने ट्रॅफिक जामचा त्रास वाढत चालला आहे.
नागरिकांचा आक्रोश — “प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात”
नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे की,
“शहरातील वाहतूक नियमनासाठी स्वतंत्र ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती, पार्किंग झोनची रचना, अतिक्रमणांवर कारवाई आणि खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.”
संपादकीय निरीक्षण
भोकरदन शहराचा विकास वेगाने होत असला तरी वाहतूक नियोजनातली तफावत ही आजची सर्वात मोठी समस्या ठरत आहे. प्रशासनाने योग्य वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही कोंडी भविष्यात मोठ्या संकटात रूपांतरित होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
भोकरदन शहरात वाहतूक कोंडीचा भडका — नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे अपेक्षेची नजर अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनाचा अभाव — रस्त्यांची दुर्दशा वाढवतेय धोका
0
8
9
4
4
8
Users Today : 14
Leave a comment