मुंबई :-
हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘हेमामालिनीचे धर्मेंद्र’ म्हणजेच सुपरस्टार धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती, मात्र आता ती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांदरम्यान त्यांच्या मराठी चित्रपटातील एका अनोख्या कामाची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे.हिचं काय चुकलं’मधील धर्मेंद्र यांचा मराठी अंदाज
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिचं काय चुकलं’ या मराठी चित्रपटात धर्मेंद्र यांनी विशेष भूमिकेत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
हेमंत कदम दिग्दर्शित या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी ‘घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव…’ या गाण्याचे शूटिंग दोन दिवस केले होते.
या गाण्याचे संगीत राम-लक्ष्मण यांनी दिले होते, तर बोल सुधीर मोग यांचे होते.
मैत्रीच्या नात्याने दिला वेळ
मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे जिवलग मित्र होते.
त्या काळात हिंदीतील आघाडीचे नायक मराठी चित्रपटात काम करणे टाळत असत, मात्र धर्मेंद्र यांनी मैत्रीच्या नात्याने हा चित्रपट स्वीकारला.
या गाण्यात त्यांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती, ज्यामुळे त्यांच्या मराठी संस्कृतीबद्दलच्या आदराची झलक दिसून आली.
धर्मेंद्र-विक्रम गोखले यांची जोडी ठरली संस्मरणीय
या गाण्यात धर्मेंद्र आणि विक्रम गोखले यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली.
चित्रपट मोठा व्यावसायिक हिट ठरला नसला तरी या गाण्यामुळे आणि धर्मेंद्र यांच्या उपस्थितीमुळे त्याला अनेक मराठी चाहत्यांची पसंती मिळाली.
प्रकृती सुधारत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
Users Today : 18