भावजईसोबतचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी भावाचा खून; बदनापूर पोलिसांची शिताफीने उकल

Khozmaster
2 Min Read

जालना जिल्हा प्रतिनिधी ;- मंठा

जालना जिल्ह्यातील बदनापुर पोलीस ठाणे हद्दीतील निकळज–सोमठाणा शिवारामधील वाला तलावात 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुरघासाच्या प्लास्टिकच्या भोक्यात गुंडाळलेला एक अनोळखी मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. नागरिकांकडून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यात आली.
तपासात मृतदेह हा परमेश्वर राम तायडे (वय 30, रा. सोमठाणा) याचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहावर गंभीर जखमा दिसून येत असल्याने खुनाचा संशय बळावला. मृतकाचे वडील रामनाथ तायडे (56) यांच्या फिर्यादीवरून बदनापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस तपासात उघडकीस आला धक्कादायक कट
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून फक्त काही तासांत आरोपींना ताब्यात घेतले. संशयित म्हणून मृतकाचा लहान भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे (28) आणि मृतकाची पत्नी मनिषा परमेश्वर तायडे (25) यांना चौकशीसाठी आणण्यात आले.
चौकशीत उघड झाले की—
मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर आणि मृतकाची पत्नी मनिषा यांच्यात अनैतिक संबंध होते.
मृतक परमेश्वर हा या संबंधांना अडथळा ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून त्याचा खून करण्याचा कट रचला.
15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 1 वाजता, दोघांनी परमेश्वरवर कुराडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून त्याला ठार मारले.
पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुरघासाच्या प्लास्टिकच्या भोक्यात टाकून, त्याचे तोंड दोरीने बांधले.
त्यानंर भोक्यावर दगड बांधून मृतदेह वाला–सोमठाणा तलावात फेकून दिला.
दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
पोलीसांची कौशल्यपूर्ण कारवाई
या प्रकरणाची उकल आणि आरोपींना अटक करण्याची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत
पोनि एम. टी. सुरवसे,
सपोनि अविनाश राठोड,
पोउपनि संतोष कुकलारे,
पोहेक इस्माईल शेख
पोकों अब्दुल बारी,
महिला पोकों प्रीती जाधव,
पोकों गोपाळ बारवाल,
चालक पोकों राम सानप
यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन्ही आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *