वाशिम प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने प्रा. आरोग्य केंद्र काटा, जऊळका आणि रिठद येथे नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेला हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.
सीईओ अर्पित चौहान यांच्या हस्ते लोकार्पण
या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण जनतेसाठी मोठा लाभ
नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे टोकाच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना त्वरित व सुरक्षित आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. तातडीच्या प्रसंगी रुग्णालयात पोहोचण्याचा वेळ कमी होईल आणि गंभीर रुग्णांच्या उपचारास वेग येणार आहे.
वैद्यकीय अधिकारी व चालकांना किल्ल्या सुपूर्द
कार्यक्रमादरम्यान तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि वाहनचालकांना रुग्णवाहिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या नवीन सुविधेमुळे आपत्कालीन सेवांबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Users Today : 17