खामगाव प्रतिनिधी ;–
खामगांव येथे शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी खामगांव नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संतोष डिवरे, उपजिल्हाप्रमुख श्री. संजय अवताडे, घाटाखालील युवासेना लोकसभा अध्यक्ष श्री. चेतन घिवे, शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजेंद्र बगे यांच्यासह खामगाव मतदारसंघातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 18