दिल्ली: हार्दिक सिंगला 2025 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; २४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Khozmaster
1 Min Read

दिल्ली –

भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधार हार्दिक सिंग यांना 2025 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. 27 वर्षीय हार्दिक सिंग हे टोक्यो 2021 आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. याशिवाय, त्यांनी या वर्षी आयोजित आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बुधवारी निवड समितीच्या बैठकीत अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्यात आली. समितीत IOA चे उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट आणि माजी हॉकीपटू एमएम सोमय्या यांचा समावेश होता. समितीने अर्जुन पुरस्कारासाठी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलॉन अॅथलीट तेजस्विन शंकर यांसह एकूण २४ खेळाडूंना शिफारस केली.

यावेळी क्रीडा पुरस्कारांच्या यादीत कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव समाविष्ट नाही. पहिल्यांदा योगासन खेळाशी संबंधित खेळाडू आरती पाल यांना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षांनी योगासन खेळाडूची निवड झाली आहे. आरती पाल सध्या राष्ट्रीय तसेच आशियाई चॅम्पियन आहेत. योगासन २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट केले जाणार आहे.

0 9 2 6 4 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *