बुलढाणा ;-
जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या शहरात जाऊन कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यशस्वी व्यवसाय उभारल्याचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलढाण्याचे युवक अभिजीत विजय अंभोरे यांनी पुणे शहरातील वाकड परिसरात साकी बार अँड रेस्टॉरंट व बहिरम थाली रेस्टॉरंट या दोन व्यवसायांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
खाजगी कामानिमित्त पुणे दौऱ्यावर असताना या दोन्ही रेस्टॉरंटना भेट देऊन अभिजीत अंभोरे यांच्या यशस्वी उद्योजकीय वाटचालीचे कौतुक करण्यात आले. बुलढाण्यासारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या महानगरात स्वतःच्या मेहनतीवर व्यवसाय उभा करणे ही निश्चितच उल्लेखनीय व प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी रेस्टॉरंटचे संचालक तथा शिवसेनेचे मुख्य पक्ष निरीक्षक विजयजी अंभोरे यांचे सुपुत्र अभिजीत विजय अंभोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अभिजीत अंभोरे यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे, उद्यमशीलतेचे तसेच रेस्टॉरंटमधील दर्जेदार भोजन व उत्कृष्ट सेवेचे विशेष कौतुक करण्यात आले.
बुलढाण्यातील युवक मोठ्या शहरात जाऊन प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर उद्योग-व्यवसायात यशस्वी ठरत आहेत, यामुळे जिल्ह्याची मान उंचावत असून इतर युवकांनाही यामुळे प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी साकी बार अँड रेस्टॉरंट व बहिरम थाली रेस्टॉरंट यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटीप्रसंगी धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता.
Users Today : 14