मेष राशी (Aries)
आजचा दिवस प्रगतीचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग असून व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. धार्मिक किंवा लांब प्रवासाचे संकेत आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा, अन्यथा अडचणी वाढू शकतात.
वृषभ राशी (Taurus)
उत्साहपूर्ण आणि सकारात्मक दिवस आहे. नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यात करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते.
मिथुन राशी (Gemini)
मानसिक शांतता लाभेल. संवादकौशल्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची पायाभरणी करता येईल. मात्र पत्नीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
कर्क राशी (Cancer)
आजचा दिवस निर्णायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत थोडी ताणतणावाची स्थिती असू शकते. कुटुंबात पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशी (Leo)
संमिश्र फलदायी दिवस. महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट भविष्यात आर्थिक फायदा देईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घर, जमीन किंवा वाहन खरेदीबाबत सकारात्मक हालचाली दिसतील.
कन्या राशी (Virgo)
आज सावधगिरी आवश्यक आहे. मानसिक तणाव जाणवू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामुळे चिंता वाढू शकते. व्यवसायात गुंतवणूक करताना घाई करू नका. वादविवाद टाळणे हिताचे ठरेल.
तूळ राशी (Libra)
आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. जुनी गुंतवणूक आता फायदा देऊ लागेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.
वृश्चिक राशी (Scorpio)
भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक दिवस. पालकांच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत चिंता वाढू शकते. व्यवसायात भागीदाराचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. राग आणि वाणीवर संयम ठेवा.
धनु राशी (Sagittarius)
आनंददायक बातम्यांचा दिवस. रखडलेली कामे पूर्ण होतील. जुना मित्र भेटल्याने मन प्रसन्न होईल. नोकरी बदल किंवा नवीन प्रकल्पासाठी अनुकूल वेळ. कौटुंबिक जीवनात शुभ घडामोडी संभवतात.
मकर राशी (Capricorn)
धावपळीचा आणि कष्टाचा दिवस. नवीन जबाबदाऱ्या वाढतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक अडचण आल्यास मित्र मदतीला येतील. घरात आनंदाची बातमी मिळू शकते.
कुंभ राशी (Aquarius)
भाग्याची साथ लाभेल. अडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात मोठ्या कराराची शक्यता आहे. मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
मीन राशी (Pisces)
आजचा दिवस थोडा कठीण ठरू शकतो. कामात अडथळे आणि विरोधक सक्रिय राहतील. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. मोठे निर्णय आज टाळावेत. कौटुंबिक वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.
Users Today : 11