साखरखेर्डा प्रतिनिधी ;-
साखरखेर्डा येथील श्री पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती, सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी १३ डिसेंबर रोजी वैकुंठ गमन झाले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदीरात मंत्रोच्चारात समाधी घेतली गेली. या कार्यक्रमास अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत गजानन गाथा पारायण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण, किर्तन यासह धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. २८ डिसेंबर रोजी सकाळी काकडा आरती, श्री चैतन्य पुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन आणि त्यानंतर श्री पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात हजारो भाविकांनी महापंगतीत महाप्रसादाचा लाभ घेतला.
Users Today : 14