बुलढाणा प्रतिनिधी ;-
बुलढाणा जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याची चर्चा असली तरी, जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये खाते असलेल्या १,३६,१७ खातेदारांच्या खात्यात तब्बल ४८ कोटी ७२ लाख रुपये जमा आहेत, जे काहींना आठ वर्षांपासून दावे न झाल्यामुळे रकमेचा उपयोग होत नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार या दावा न झालेल्या ठेवींना संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या कार्यालयामार्फत सोमवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात १० वर्षांपेक्षा जास्त काळ बँक, पेंशन, विमा, शेअर, म्युच्युअल फंड इत्यादी ठिकाणी जमा असलेल्या आणि व्यवहार न झालेल्या रकमेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. या मोहिमेत संबंधित खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना रक्कम परत देण्यात येणार आहे.
खातेदारांनी उद्यम पोर्टल किंवा संबंधित बँक/संस्थेच्या संकेतस्थळावर आपली माहिती तपासून आवश्यक कागदपत्रांसह बँक शाखेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 14