नागपूर प्रतिनिधी :-
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल १९४ मुक्त निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत.
या मुक्तचिन्हांमध्ये सफरचंद, बिस्किट, पाव, केक, ढोबळी मिरची, फुलकोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, अननस, कलिंगड, आक्रोड, जेवणाची थाळी आदी चिन्हांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांसह अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्तचिन्हांमधून चिन्हांची निवड करता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त असे ४१६ राजकीय पक्ष असून, त्यांना मान्यताप्राप्त पक्षांची राखीव चिन्हे न देता स्वतंत्र मुक्तचिन्हे देण्यात येणार आहेत. अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना तीन मुक्तचिन्हांची प्राधान्यक्रमानुसार नोंद करणे बंधनकारक असणार आहे. वाहन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संबंधित चिन्हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
१९ राजकीय पक्षांची चिन्हे राखीव
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा देण्यात आली आहे. यात राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि इतर राज्यांतील नऊ अशा एकूण १९ राजकीय पक्षांची चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत.
२ जानेवारीनंतर चिन्हवाटप
२ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारीनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, ३ जानेवारीला सर्व उमेदवारांचे अंतिम चिन्ह स्पष्ट होणार आहे. चिन्हवाटप करताना आघाड्या, फ्रंट यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. एखाद्या चिन्हासाठी एकापेक्षा अधिक आघाड्यांनी मागणी केल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला जाईल. त्यानंतर उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार देण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपालिका निवडणूक : अपक्ष उमेदवारांसाठी १९४ मुक्तचिन्हे उपलब्ध
0
9
4
5
8
2
Users Today : 19
Leave a comment