सिंदखेडराजा : आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव साजरा करण्याची तयारी जोरात

KHOZ MASTER
2 Min Read

सिंदखेडराजा प्रतिनिधी ;-

१२ जानेवारी २०२६ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे सालाबादप्रमाणे लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी सर्वांनी परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांनी प्रतिपादन केले.
मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टीवर पार पडली. यावेळी जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, प्रा. शिवाजीराव तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अॅड. उर्मिला हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योती जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीलाच जिजाऊ माँसाहेब पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर जिजाऊ स्तवन पार पडले. मुख्य बैठकीत जन्मोत्सवाच्या आयोजनातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन व नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टीपर्यंत एस.टी. महामंडळाच्या बसेस अल्प दरात उपलब्ध कराव्यात, अशी योजना ठरवण्यात आली. यामुळे लहान मुले, महिला, पुरुष आणि इतर भक्तांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.
त्याचबरोबर सर्व पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता, वाहतूक सुरक्षीतपणे चालवणे, स्थानिक शाळांच्या बस व्यवस्थेचा वापर यावरही चर्चा झाली. जिजाऊ जन्मोत्सवाच्या प्रचार आणि प्रसारासाठी समाज माध्यमांचा योग्य वापर करून माहिती महाराष्ट्रभर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.
बैठकीत येणाऱ्या सुविधा, खर्च, निधीचे नियोजन व पारदर्शकता यावरही समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली, ज्यामुळे १२ जानेवारीला होणारा जन्मोत्सव सुसंगत आणि यशस्वी पद्धतीने पार पडावा, असा हेतू संघाने व्यक्त केला.

0 9 7 3 9 3
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *