मेहकर –
शहरातील शिक्षक कॉलनी, वार्ड क्रमांक १ येथे रविवारी (दि. २८ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नी व चार वर्षांच्या चिमुकल्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे मेहकर तालुका हादरून गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व चार वर्षांचा मुलगा रियांश हे पती राहुल म्हस्केसोबत माहेरहून मोळा येथून सासरी मेहकर येथे आले होते. रात्री सुमारे अडीचच्या सुमारास घरगुती संशयातून राहुल म्हस्के याने कुऱ्हाडीने पत्नी रूपाली व मुलगा रियांश यांच्यावर वार केले. या हल्ल्यात रियांशचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या रूपालीला उपचारासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना तिचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले. मृतक रूपाली व रियांश यांच्यावर मोळा येथील माहेरी एकाच चितेवर सायंकाळी सात वाज
Users Today : 11