हिवाळ्यात बाइक चालवताना सुरक्षिततेसाठी महत्वाच्या ४ टिप्स

Khozmaster
2 Min Read

वाशिम प्रतिनिधी –
सध्या राज्यात थंडी वाढली असून अनेक शहरांमध्ये तापमान १८ अंशांखाली झुकले आहे. पहाटे सर्वत्र धुकं पसरल्याचे पाहायला मिळते. अशा हवामानात बाइकने ऑफिससाठी प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे अपघातांची शक्यता देखील वाढते.
हिवाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी खालील ४ महत्वाच्या टिप्स लक्षात घ्या:
१. योग्य कपड्यांचा वापर करा
बाइकवर प्रवास करताना थंडीपासून संरक्षणासाठी तीन ते चार लेअर्ससह उबदार कपडे घालणे गरजेचे आहे. आत इनर, त्यावर शर्ट आणि लेदर जॅकेट किंवा स्वेटर परिधान करा. पायात मोजे आणि बूट, हातात बाइकसाठी योग्य ग्लोव्हज, कान व चेहऱ्यासाठी मफलर किंवा फेस मास्क घालणे महत्वाचे आहे.
२. ABS मोडचा वापर करा
अलिकडच्या बाइक्समध्ये विविध रायडिंग कंडिशननुसार ABS मोड उपलब्ध असतो – जसे नॉर्मल, रेन किंवा स्नो मोड. ओल्या रस्त्यांवर बाइक घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य ABS मोड वापरा. ABS नसल्यास बाइकचा वेग कमी ठेवा आणि नियंत्रण राखा.
३. लो बीमचा वापर करा
थंडीत रस्त्यावरील धुकं आणि ओलेपणामुळे हाय बीम वापरल्यास समोरून येणाऱ्यांसाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे हिवाळ्यात बाइक चालवताना नेहमी लो बीमचा वापर करा, रस्ता सुरक्षित ठेवा.
४. शांत आणि सावध प्रवास करा
वळणावळणाच्या रस्त्यांवर, धुक्यात किंवा ओल्या रस्त्यांवर नेहमी सावधगिरी बाळगा. रस्त्यावरून वाहन चालवताना वेग कमी ठेवा, सुरक्षित अंतर राखा आणि अचानक ब्रेकिंग टाळा.
हिवाळ्यात या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही स्वतःला थंडीपासून वाचवू शकता तसेच सुरक्षित प्रवासही सुनिश्चित करू शकता.

0 9 4 5 4 1
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *