डोणगाव शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

वणी प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
दि. २३ जानेवारी रोजी यवतमाळ रोडवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धाकृती शिल्प प्रतिमेस सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वणी शहराजवळील अपंग निवासी विद्यालय (वागदरा) तसेच रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय, यवतमाळ रोड, चिखलगाव येथे मूकबधिर विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
तसेच दि. २४ जानेवारी रोजी धीरज राजूरकर (उपतालुकाप्रमुख, शिरपूर–कायर सर्कल) यांच्या संकल्पनेतून ढाकोरी (बोरी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले. यानंतर शिरपूर (वारगाव) येथील आश्रम शाळेतही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले.
या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

0 9 7 3 9 4
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *