प्रजासत्ताक दिनी थरार! भ्रष्टाचाराविरोधात युवकाचा ३०० फूट टॉवरवर चढून आंदोलन

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनीच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी वैभव खरे या युवकाने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थरारक आंदोलन केले. वैभव खरे यांनी आज सकाळपासून बुलढाणा शहरातील बीएसएनएलच्या सुमारे ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मांडवा येथील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त करत वैभव खरे यांनी हे आंदोलन केले. या संदर्भात त्यांनी यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने दिली, तक्रारी केल्या तसेच आंदोलनेही केली; मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले.
प्रजासत्ताक दिनीच हे आंदोलन झाल्याने पोलीस व प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. घटनास्थळी पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत वैभव खरे यांच्याशी संवाद साधला. प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा व चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर अखेर वैभव खरे टॉवरवरून खाली उतरले.
यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी वैभव खरे यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

0 9 5 5 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *