दक्षिण बुलडाणा प्रतिनिधी –
राजा – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजींच्या पादूका दर्शन सोहळ्याचे आयोजन धोंडीराज मठ, जालना रोड, देऊळगांव राजा येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, सहपीठ प्रमुख खंडागळे, व्यवस्थापक सुरेश मोरे, सहव्यवस्थापक ऋषिकेश बिरारी, पीठ इंजिनियर श्री दिपक चिंचोले, पीठसमिति सदस्य श्री संतोष दसरे सर, पीठ महिला निरीक्षक सौ. लताताई दिपक चिंचोले आणि पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
पश्चिम विदर्भ पीठ अंतर्गत दक्षिण बुलडाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका समिती सदस्य, सेवक, उपासक, भाविक, भक्त, साधक, शिष्य व हितचिंतक या पादूका दर्शन सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमामध्ये पादूका दर्शन, उपासक दीक्षा व गुरुपूजन या सोहळ्यांचा समावेश असेल. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उपासक दीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, इंग्रजी माध्यमातील मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे इत्यादींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ मध्ये १५ दिवसांत १,७१,१५० रक्त कुपिंकांचे संकलन, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १,११,४२४ वृक्षारोपण, तसेच १७६ देहदान व ११७ अवयवदान यशस्वीरित्या करण्यात आले.
संपूर्ण जिल्हा सेवा समिती आणि दक्षिण बुलडाणा जिल्हा सेवाध्यक्ष गणेश खडोळ, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. आशाताई निभोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश गुजर, देऊळगांव राजा तालुकाध्यक्ष गणेश बोराटे यांनी सर्व भाविकांना सहकुटुंब, मित्र व आप्तइष्टांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादूका दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
देऊळगांव राजा: जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादूका दर्शन सोहळ्यासाठी भाविकांना आमंत्रण
0
9
7
3
9
4
Users Today : 13
Leave a comment