लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठे अपडेट केवायसीअभावी ३०,९१८ महिलांचा लाभ तात्पुरता बंद; पडताळणीनंतर हप्ता मिळणार

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, केवायसी (KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे मोठ्या संख्येने महिलांना हा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाकडून दरमहा पात्र महिलांना १,५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान हा हप्ता २,१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र सध्या हप्ता १,५०० रुपयांवरच कायम आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर हप्ता उशिरा जमा झाला असला, तरी केवायसीमुळे काही महिलांना लाभ मिळू शकलेला नाही.
केवायसीमुळे लाभ थांबलेल्यांची संख्या ३०,९१८
नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, केवायसी अद्ययावत नसल्यामुळे तब्बल ३०,९१८ महिलांचा डिसेंबर महिन्याचा लाभ तात्पुरता बंद झाला आहे. यापैकी २२,९२१ महिला ग्रामीण भागातील असल्याची माहिती आहे.
पडताळणीनंतर लाभ पुन्हा सुरू होणार
शासनाने केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित महिलांनी ३१ जानेवारीपर्यंत आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पडताळणीसाठी आधारकार्डाची झेरॉक्स प्रत तसेच स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांना घाई न करण्याचे आवाहन
केवायसी प्रक्रियेमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी कोणाचाही कायमस्वरूपी लाभ बंद करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पात्र महिलांना पडताळणीनंतर लाभ दिला जाईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

0 9 5 5 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *