रौनक-ए-शान बुलढाणा’ पुरस्काराचे वितरण उत्साहात

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी –
संवेदना चॅरिटेबल संस्था, बुलढाणा व युगप्रवर्तक समतावादी विचार न्याय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रौनक-ए-शान बुलढाणा’ पुरस्काराचे वितरण २५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून बुलढाणा शहराचे नाव राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या सोहळ्यात संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रवीण सुरडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यभावनेतून शहरातील मान्यवरांचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोकुल शर्मा यांनी भूषविले. यावेळी संजय राठोड, अॅड. जयश्री शेळके, अॅड. सानप, अॅड. विजय सावळे, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक विनोद बेंडवाल व अनिल वर्मा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात भारतीय सेनेचे वाहन दरीत कोसळून शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यंदाच्या ‘रौनक-ए-शान बुलढाणा’ पुरस्काराने क्रीडाक्षेत्रातील इद्रिस मकरानी, मिहीर अपार, प्रज्वल धंदर, काव्या कारंजकर, भारत विद्यालय क्रिकेट संघ (मुली व मुले), श्रद्धा पडोळ; सामाजिक व विधी क्षेत्रातील अॅड. शरद राखोंडे, रविंद्र पाटील, तिलक तोंडिलायता, बुलढाणा न्यायालयीन कर्मचारी क्रिकेट संघ; तसेच पौर्णिमा सोनुने, जयेश राठोड, मानव सेवा फलाह-ए-आम ट्रस्ट, १०७ वेळा रक्तदान करणारे वन्यजीव सोयरे गणेश श्रीवास्तव, पर्यावरण मित्र विनोद इंगळे, सर्पमित्र रोहन इंगळे, सचिन सरदार, सुभाष देशमुख, अनिल वाघ, प्रकाश काकफळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विष्णू धंदर व घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारे राजू सपकाळ आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅड. प्रवीण सुरडकर, अॅड. गुणवंत नाटेकर यांच्यासह अॅड. धिरज गोठी, अॅड. मदन मगर, अॅड. अमर भालेराव, अॅड. राहुल शिंदे व अॅड. राहुल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 9 5 5 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *