अमरावती प्रतिनिधी :
१९६५ च्या युद्धात भारताला विजय मिळाला, तरी त्या काळात शस्त्रास्त्र तंत्रज्ञान विदेशी अवलंबित्वावर होते. मात्र आता भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्राचे उत्पादन सुरू आहे. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला यश मिळाले, असे प्रतिपादन पुणे येथील डीआरडीओचे सेवानिवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर व्याख्यान झाले.
विचारमंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, पुणे येथील माजी प्राचार्य व नॅक मूल्यांकन समितीचे माजी सदस्य डॉ. नागनाथ धर्माधिकारी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि विद्यापीठ गीताद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना डॉ. राजीव बोरकर यांनी कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केले.
व्याख्याते काशीनाथ देवधर यांचा परिचय विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू यांनी करून दिला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीगीत सादर केले, तर मंजरी बहादुरे यांनी गायलेले वंदे मातरम् गीत कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनाके, तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद तट्टे यांनी केले.
अमरावती : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील यश आत्मनिर्भर भारतामुळे – काशीनाथ देवधर
0
9
7
3
9
5
Users Today : 14
Leave a comment