अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान अजित पवार देत होते. अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणारे आहे. वैक्तिगत माझ्याकरता एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र मला सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लवकरच बारामतीकडे रवाना होत आहे. सकाळपासूनच मी सर्वांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या सर्व परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलेले आहे.
Users Today : 15