मेहकर प्रतिनिधी : 28 जानेवारी रोजी जानेफळ येथे सामाजिक कार्यकर्ते व मेहकर विधानसभा काँग्रेसची समन्वयक व देवानंद भाऊ पवार यांच्या कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजितदादांच्या जीवनावर देवानंद पवार बोलत असताना “महाराष्ट्राचा ढाण्या वाघ व एका कणखर विकासभिमुख नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला” अशा भावनिक शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी नामदेव राठोड, अनिल वानखेडे, विठ्ठल सांगाडे, शेख इरफान, अजित सूर्य, अशोक उबाळे, राजूमिटकरी, शेख इरफान, पिंटू जाधव, यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होत
Users Today : 15