बुलढाणा प्रतिनिधी :
विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. २८ व २९ जानेवारी रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी श्रद्धांजली सभा, बंद व शोकसभा आयोजित करण्यात आल्या. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बारामती येथे झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील चिखली, धाड, चांडोळ, सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक, शेंदुर्जन आदी भागांत स्वयंस्फूर्त बंद पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
🔹 चिखली येथे सर्वपक्षीय बंद
चिखली शहरात २९ जानेवारी रोजी सर्वपक्षीयांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. आमदार श्वेताताई महाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता. सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिवसभर शहरातील व्यवहार बंद ठेवून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
🔹 धाड येथे व्यापाऱ्यांचा सहभाग
बुलढाणा तालुक्यातील धाड येथेही स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. व्यापारी संघटना, डॉक्टर, मेडिकल व पॅथॉलॉजी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण परिसर शोकमय वातावरणात बुडालेला दिसून आला.
🔹 वर्दडी बुद्रुक येथे कडकडीत बंद
सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. बसस्थानक परिसरात ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सरपंच पुष्पाबाई इनकर, माजी सरपंच भगवान काकडे, उपसरपंच ज्ञानेश्वर चव्हाण, पंढरीनाथ काकडे, प्रकाश काकडे, हरिभाऊ काकडे, सुधाकर साळवे, सुरेश काकडे, रवींद्र नागरे, कल्याण काकडे, दत्तात्रय पवार, अरुण म्हस्के, तान्हाजी काकडे, प्रल्हाद आटोळे, राजेश काकडे, राधाकिशन आटोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹शाळांमध्येही श्रद्धांजली
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात शोककळा ; अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वत्र श्रद्धांजली
0
9
5
5
4
5
Users Today : 3
Leave a comment