संग्रामपूर तालुक्यातही कडकडीत बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून संग्रामपूर तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. तालुक्यातील संग्रामपूर, पातुर्डा, वरवट बकाल व वानखेड येथे सर्वपक्षीयांच्या वतीने तसेच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दिवसभर तालुक्यातील बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. विशेषतः तालुक्यातील मोठे व्यापारी केंद्र असलेल्या वरवट बकाल येथे मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी, नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बसस्थानक परिसरात श्रद्धांजली सभा
वरवट बकाल येथील बसस्थानक परिसरात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संपूर्ण तालुक्यात शोकमय वातावरण असून “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त होत होती.

0 9 7 3 9 6
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *