बुलढाणा प्रतिनिधी :
येथील जिल्हा महिला रुग्णालय गोरगरीब महिलांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असून, येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने पुन्हा एकदा वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे. आज (दि. २९) एका महिलेच्या पोटातील गर्भपिशवीत वाढलेला तब्बल सहा किलो वजनाचा मांसाचा गोळा यशस्वीरीत्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असूनही ती यशस्वी झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
संबंधित महिला गेल्या एक वर्षापासून तीव्र पोटदुखीने त्रस्त होती. विविध ठिकाणी उपचार करूनही कोणतेही ठोस निदान होत नव्हते. अखेर नातेवाइकांनी तिला बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात दाखल केले. येथे करण्यात आलेल्या सोनोग्राफी तपासणीत तिच्या पोटात मोठ्या आकाराचा मांसाचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले.
सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
ही शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यशस्वी शस्त्रक्रियेची टीम
शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकात –
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. संजीवनी वानरे, डॉ. योगेश शिंदे,
भूलतज्ज्ञ डॉ. प्रियंका पाटील,
तसेच परिचारिका व कर्मचारी – उजाडे, छाया पांडे, अमित किन्हीकर, दीपाली बिबे, आम्रपाली आरख, सुनीता मंजुळ, शुभम मोहटे, सूरज हिवाळे, सुलभा आव्हाड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आव्हानात्मक शस्त्रक्रिया
या महिलेला यापूर्वी दोन सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या होत्या तसेच दुर्मिळ रक्तगट असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक जोखमीची होती. तरीही डॉक्टरांनी धाडसाने व कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
अर्भकाइतका मोठा मांसाचा गोळा
साधारणतः नवजात अर्भकाचे वजन ३ ते साडेतीन किलो असते. मात्र या महिलेच्या गर्भपिशवीत वाढलेला मांसाचा गोळा तब्बल ६ किलो वजनाचा होता. त्यामुळे महिलेला तीव्र वेदना व आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जिल्हा महिला रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास दृढ झाला असून डॉक्टरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
महिलेच्या पोटातून काढला सहा किलोचा मांसाचा गोळा जिल्हा महिला रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
0
9
7
3
9
6
Users Today : 15
Leave a comment