बुलढाणा प्रतिनिधी :
IIT पवई येथून शिर्डी मार्गे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या चरणी जाणारी पायी दिंडी काल बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे दाखल झाली. सरस्वती नगर येथील डॉ. प्रशांत ढोरे यांच्या निवासस्थानी दिंडीचे भक्तिरसात स्वागत करण्यात आले.
श्री साई गजानन मित्रमंडळ, IIT पवई यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या पालखीचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. यावेळी श्री साईबाबा व संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत राज्य व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
ही पायी दिंडी भक्ती, शिस्त आणि सेवाभाव यांचे प्रतीक असून समाजाला सदमार्गावर नेणारी प्रेरणा ठरते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. भजन-कीर्तन, आरती व जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसत होता.
पालखी दर्शनावेळी पालखी प्रमुख मधुकर भसरे, शिवदूत तालुका प्रमुख नितीन राजपूत, राजेश्वर उबरहंडे, नगरसेवक बाळासाहेब धुड, गोटू शर्मा, अमित ठाकरे, आश्रुबा शेवाळे, सोहम झाल्टे, तुषार सावजी, पद्मनाभ बाहेकर, अमित भटकर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच साई–गजानन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीतील वारकरी व भक्तांची तपश्चर्या, त्याग व सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संतांची वारी भक्ती, एकोपा आणि संस्कारांची परंपरा दृढ करणारी असून ही आध्यात्मिक ऊर्जा सर्वांच्या जीवनाला सकारात्मक दिशा देणारी आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Users Today : 4