स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली गांधी भवन येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना बुलढाणा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील गांधी भवन येथे आयोजित भव्य श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. सर्वसामान्यांचे प्रश्न सातत्याने मांडत कार्यकर्त्यांच्या बळावर उभे राहिलेले ते कर्तव्यदक्ष नेतृत्व होते, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
या प्रसंगी मी स्वतः स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले व राज्याच्या विकासाला चालना दिली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शिस्तप्रिय नेतृत्व, कामाला सर्वोच्च प्राधान्य, पारदर्शक प्रशासन आणि कार्यकर्त्यांशी असलेले आपुलकीचे नाते ही स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ते केवळ राजकीय नेते नव्हते, तर हजारो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व आधारस्तंभ होते, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या श्रद्धांजली सभेस आमदार राजेंद्रजी शिंगणे, श्री. धीरजजी लिंगाडे, श्री. लक्ष्मणराव भुमरे, श्री. विजयजी अंभोरे, श्री. टी. डी. अंभोरे, बुलढाणा नगरपालिका गटनेते युवानेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड, सौ. अनुजाताई सावळे, श्री. ओमसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष श्री. गजेंद्र दांदडे, शिवसेना शहरप्रमुख श्री. आशिष जाधव, युवासेना शहरप्रमुख श्री. श्रीकांत गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र काळे, श्री. राजेश्वर उबरहंडे, श्री. कुणाल पैठणकर, सौ. जिजाबाई राठोड, सौ. मयुरीताई देशपांडे, सौ. प्रमिलाताई गवई, पत्रकार श्री. अरुण जैन यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सभापती तसेच शिवसेना, युवासेना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पवार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना केली. श्रद्धांजली सभा शांत, भावनिक आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली.

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *