ठा तालुक्यात कुसुम अभियान गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

Khozmaster
2 Min Read

30 जानेवारी 2026 ते 13 2026 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन.. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमितन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने दिले मुळे मंठा तालुक्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगन्नाथ कुंडकर यांनी दिली.. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत तालुक्यात 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुष्ठरोग विषयक संदेश देण्यात येऊन जनजागृतीपर अभियानाच्या माहितीसह जिल्हाधिकारी यांच्या कुष्ठरोगा बाबतचया आवाहनाचे वाचनही केले जाणार आहे ग्रामसभेतच कुष्ठरोग उपणासंबधी माहिती देऊन उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र नागरी दवाखान्यात शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात याचा संदेश दिला जाणार आहे या पंधरवड्यात शाळेत विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे त्या मध्ये निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा प्रशमंजुषा कुष्ठरोग वरील गीत .नाटक आदी चे आयोजन करण्यात येणार आहे त्याच बरोबर ऊसतोडणी कामगार ..मुलीचे वस्तीग्रह विट कामगार स्थलातरीत कामगार याची आरोग्य तपासणी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या कडून करण्यात येणार आहे अनुसंघाने आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंठा तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगन्नाथ कुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांची कार्यशाळ घेऊन या अभियान ची माहिती देण्यात आली हे अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ सुधाकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे या कार्यशाळेत आरोग्य सहाय्यक सुजीत वाघमारे विलास देशमुख प्रकाश प्रधान गंगाधर बुधंवत अशोक जावळे विकास ढोणे दिपक घुगे धुरपंत मस्के शिवप्रसाद बिचेवार सुभाष बगाटे यांच्या सह सर्व आशा स्वयंसेविका हजर होते

0 9 4 5 4 1
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *